दिनांक 25 August 2019 वेळ 1:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » उधवा तीन रस्ता येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

उधवा तीन रस्ता येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

प्रतिनिधी/तलासरी, दि. 16 : तलासरीकडून उधवाकडे आणि धुंदलवाडीकडून उधवामार्गे सेलवासा (डीएनएच) औद्योगिक वसाहतीकडे येणार्‍या-जाणार्‍या लहान, मोठ्या वाहनांची या राज्यमार्गावरून रात्रंदिवस रहदारी सुरू असते. ही वाहने उधवा गावातून अतिशय भन्नाट वेगाने पसार होत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता येथील तीन रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

उधवा, खानवेल मार्ग व सायवन मार्ग पोलीस चौकी ते उधवागाव बाजारपेठेकडून तलासरी व धुंदलवाडीकडे जाणार्‍या या अर्धा किमी अंतर असलेल्या तीन मार्गावर अत्यंत भरधाव गतीने वाहने हाकली जात असल्याने यापुर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. लहान वाहनांसह टँकर व कंटेनरसारखी मोठी वाहने देखील सुसाट वेगाने चालवली जात असल्याचे या मार्गांवर पाहायला मिळते. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण करत असतानाच येथे गतिरोधक बनविणे आवश्यक होते. मात्र ते न बनविल्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता घेऊन जीवितहानी टाळण्यासाठी उधवा चौकी ते तलासरीकडे जाणार्‍या या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे असुन उधवा ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उप विभागाने पावसाळ्यापुर्वीच येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top