दिनांक 25 August 2019 वेळ 1:31 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोबाईल सेवेतील नेटवर्कच्या समस्येमुळे जव्हारकर हैराण

मोबाईल सेवेतील नेटवर्कच्या समस्येमुळे जव्हारकर हैराण

प्रतिनिधी/जव्हार, दि. 16 : डिजीटल इंडियाचे स्वप्न पाहणार्‍या भारतात आजही अनेक ठिकाणी मोबाईल सेवा पोहोचू शकलेली नाही. तर जेथे पोहोचली आहे तिथे मोबाईल नेटवर्कच्या समस्येचा नागरीकांना सामना करावा लागत असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते. यात जव्हार शहराचाही समावेश असुन येथे हजारो ग्राहक जिओ, वोडाफोन व एअरटेलसारख्या मोठ्या मोबाईल नेटवर्क सेवांचा वापर करीत आहे. मात्र 90 दिवसांचा आगाऊ रिचार्ज करूनही ग्राहकांना आपल्या हक्काच्या सेवेचा उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

हल्लीच्या डिजीटल युगात सगळ्याच गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून होत असून यात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरुन विविध वस्तु खरेदीचा समावेश आहे. मात्र मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे वेबसाईट्स उघडण्यास विलंब, उघडल्याच तर पेमेंट करताना निर्माण होणारी अडचण व त्यातच ऑर्डर पुर्ण न होता बँक खात्यातून रक्कम वजा झाल्यास पुन्हा ती मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ तसेच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. अशाच काही इंटरनेटशी संबंधित समस्यांचा जव्हारकरांना अनेकदा सामना करावा लागत आहे.

आगाऊ रक्कम घेऊनही मोबाईल नेटवर्क कंपन्या चांगली सेवा तर सोडाच समाधानकारक सेवा देखील देत नसल्याची जव्हारमधील अनेक ग्राहकांची तक्रार आहे. याआधी ग्रामीण भागात टाटा कंपनीचे चांगले नेटवर्क होते. मात्र टाटा कंपनीची सेवा बंद झाल्यानंतर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असुन या गोष्टी लक्षात घेऊन मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top