दिनांक 25 May 2019 वेळ 10:23 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » चुलत भावाचा खून करणार्‍या आरोपीला आजन्म तुरुंगवास

चुलत भावाचा खून करणार्‍या आरोपीला आजन्म तुरुंगवास

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : अज्ञात कारणावरुन आपल्या चुलत भावाचा हातोडीने डोक्यात हल्ला करुन निर्घण खून करणार्‍या आरोपीला न्यायालयाने आजन्म तुरुंगवास व 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. इन्कलाब दुखलाख शेख (वय 34) असे सदर आरोपीचे नाव असुन 6 वर्षांपुर्वी ही घटना घडली होती.

नवी मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी असलेला इन्कलाब शेख 19 ऑगस्ट 2013 रोजी आपल्या नालासोपारा येथील चुलत भावाच्या घरी राहायला आला होता. त्याच दिवशी रात्री इन्कलाब शेख व त्याचा चुलत भाऊ असे दोघे त्यांच्या दुकानाच्या गाळ्यामध्ये झोपायला गेले असताना इन्कलाबने अज्ञात कारणावरुन झोपी गेलेल्या त्याच्या भावाच्या डोक्यात हातोडीने प्रहार करुन त्याचा निर्घण खून केला होता. दुसर्‍या दिवशी (20 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर इन्कलाब विरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, नालासोपारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक जाधव व त्यांच्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक लांडगे यांनी याप्रकरणी अधिक तपास करत आरोपीविरोधात सबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सदर पुराव्यांच्या आधारे आरोपी इन्कलाब शेखला आजन्म तुरुंगवास तसेच 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला असुन शिक्षेनंतर त्याची ठाणे येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top