दिनांक 26 May 2020 वेळ 7:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » उत्तर प्रदेशातुन अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका

उत्तर प्रदेशातुन अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका

तुळींज पोलिसांची कर्तव्यदक्ष कामगिरी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : उत्तर प्रदेश राज्यातून अपहरण करुन आणलेल्या 2 अल्पवयीन मुलींची तुळींज पोलिसांनी काही तासांतच सुखरुप सुटका केली आहे. तसेच याप्रकरणी अभिजीत यादव नामक अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली असुन त्याची चौकशी सुरु आहे.

, मंगळवारी (दि. 14) संध्याकाळी 5.20 च्या सुमारास तुळींज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेंद्र शिवदे यांना अभिजीत यादव नामक इसमाने उत्तर प्रदेश राज्यातून एक 16 वर्षीय व एक 17 वर्षीय अशा 2 अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन त्यांना तुळींज पोलीस स्टेशन हद्दीतील रहमत नगर या ठिकाणी डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. शिवदे यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालत उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातील सोनोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्याठिकाणी सदर मुलींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. या प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन शिवदे यांनी लागलीच नालासोपार्‍याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड यांच्याशी संपर्क साधुन या अपहरण प्रकरणाची माहिती त्यांना दिली. यानंतर तोटेवाड यांनी तुळींज पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍यांना कारवाईच्या सुचना देत एक पथक रहमत नगर येथे पाठवले असता सदर पथकाने तासाभरातच दोन्ही पीडीत मुलींची सुटका करत आरोपी अभिजीत यादव याला अटक केली. दरम्यान, पीडित मुलींच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली असुन ते मुलींचा ताबा घेण्यासाठी उत्तर प्रदेश येथुन रवाना झाले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top