दिनांक 26 May 2020 वेळ 8:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू पोस्ट कार्यालयात चोरीचा अयशस्वी प्रयत्न!

डहाणू पोस्ट कार्यालयात चोरीचा अयशस्वी प्रयत्न!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 14 : येथील पोस्ट कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. 11 मेच्या मध्यरात्री ही घटना घडली असुन पोस्ट मास्टरच्या तक्रारीवरुन डहाणू पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मेच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी डहाणू पोस्ट कार्यालयाचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी तिजोरी रुमचेही कुलुप तोडुन कटरच्या सहाय्याने तिजोरीचा दरवाजा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. पोस्ट कार्यालयात जमा करण्यात आलेल्या पैशांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या या चोरट्यांकडून विविध प्रकारे तिजोरीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचे सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरले व त्यांना रिकामी हाती परतावे लागले. 12 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोस्ट मास्टर यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top