दिनांक 17 July 2019 वेळ 4:43 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बांधकाम व्यावसायिकाच्या खुनातील आरोपीला 16 वर्षानंतर अटक

बांधकाम व्यावसायिकाच्या खुनातील आरोपीला 16 वर्षानंतर अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 14 : बांधकाम व्यावसायिकाचा खुन करुन मागील 16 वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात वसई स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे.

नालासोपारा पुर्वेतील बांधकाम व्यवसायिक राजेश चंद्रकांत पतंगे (वय 42) यांचा 25 सप्टेंबर 2013 रोजी रात्री 9.45 च्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात इसमांनी पिस्तुलीने गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता मिरारोड येथील जमिनीच्या वादातून पतंगे यांचा खून केल्याचे समोर आले होते. यानंतर एकुण 14 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यातील 10 जणांना अटक केली होती. तर इतर 4 आरोपी या घटनेनंतर फरार झाले होते. दरम्यान चौघांपैकी एक आरोपी मुंबई पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याने पोलीस मागील 16 वर्षांपासुन उर्वरित 3 आरोपींच्या मागावर होते. नुकतीच वसई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना पतंगे खून प्रकरणातील एक फरार आरोपी बोरीवली रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सदर आरोपीला अटक केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top