दिनांक 09 December 2019 वेळ 10:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसई : घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक

वसई : घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक

  • अनेक गुन्ह्यांची उकल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 13 : नायगाव पुर्व भागातील एका घरात रात्रीच्या सुमारास चोरी करुन हजारोंचा ऐवज लंपास करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने अटक केली असुन त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस आले आहेत.

नायगाव पुर्वेतील चिंचोटी भागात राहणार्‍या अब्दुल नदीम सिध्दीकी यांच्या घरात 5 मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने व दोन मोबाईल फोन असा एकुण 45 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी वालिव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वसई स्थानिक गुन्हे शाखेने 4 संशयितांना अटक केली होती. या चौघांच्या चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी वाडा पोलिस स्टेशन हद्दीत महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर तसेच आणखी काही ठिकाणी चोर्‍या केल्याचे कबुल केले असुन पोलीस चौघांचीही कसुन चौकशी करत आहे. यातुन आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, या चोरट्यांकडून नायगाव पुर्वेतील गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top