दिनांक 24 February 2020 वेळ 8:30 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक

विनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक

फाइल फोटो

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 12 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतुक करणार्‍या एका ट्रकवर कारवाई करत 30 टन रेती जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी ट्रकचा चालक व क्लिनरला अटक करण्यात आली असुन दोघांसह ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास महामार्गावरील वडवली गावच्या हद्दीतील झायका हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. एम.एच. 39/टी. 5131 या क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी संशयावरुन अडवून त्याची तपासणी केली असता त्यात 60 हजार रुपये किंमतीची 30 टन रेती आढळून आली. या रेतीबाबत ट्रकचालकाकडे कोणताही परवाना तसेच आवश्यक कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी रेती व ट्रक जप्त करत ट्रकचा चालक असाद अली मुस्तार अहमद व क्लिनर जल्लाऊद्दीन छोट कौडद्रीशी या दोघांना अटक केली आहे. तसेच ट्रकच्या मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलासरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top