दिनांक 21 July 2019 वेळ 5:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीला 5 वर्षांची शिक्षा

महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीला 5 वर्षांची शिक्षा

वसई, दि. 12 : एका महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 5 वर्षे तुरुंगवास तसेच 15 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. यशवंत आत्मताराम ठाकुर असे सदर आरोपीचे नाव आहे. वसई तालुक्यातील पणजुगावात राहणार्‍या 46 वर्षीय यशवंत ठाकुरने 16 एप्रिल 2014 रोजी आपल्या मैत्रीणींसोबत एक कार्यक्रम बघण्यासाठी चाललेल्या पीडित महिलेला अंधारात खेचुन तिच्याबरोबर अश्‍लिल चाळे केले होते. यानंतर सदर महिलेच्या तक्रारीवरुन ठाकुर विरोधात वसई पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी वसई पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उप निरिक्षक कलकुटगे यांनी अधिक तपास करत सबळ पुराव्यांसह आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी यशवंत ठाकुरला पाच वर्षांची शिक्षा व 15 हजार 500 रूपये दंडा शिक्षा सुनावली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top