दिनांक 21 July 2019 वेळ 6:12 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात 6 ठार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात 6 ठार

2 जखमी, 3 वाहनांचा चक्काचूर

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 10 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारसमोर अचानक दुचाकीस्वार आल्याने झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास हा अपघात घडला. महामार्गावरील कासा पोलीस स्टेशनच्या आंबोली गाव हद्दीत एक दुचाकीस्वार अचानक कारसमोर आल्याने कारची दुचाकीला धडक बसली व पुढे अनियंत्रीत झालेली कार दुसर्‍या एका कारला धडकली. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असुन एकुण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अपघातातील मृतांची नावे :-
नवनाथ रमाकांत नवले (वय 25, रा. मोखाडा)
भागवत दगडू जाधव (वय 55, रा पनवेल)
दिलीप मधुकर चांदणे (वय 30, रा. पनवेल)
प्रतिभा परिमल शहा (वय 70, रा. कांदिवली)
राकेश प्रविणलाल शहा (वय 60, रा. कांदिवली)
आकाश चव्हाण (वय 35, रा. बोरिवली)

जखमींची नावे :-
नरेश नारायण सुपे (वय 23, रा. मोखाडा)
जिंदल हिरेन शहा (वय 22, रा. कांदिवली)

comments

About Rajtantra

Scroll To Top