दिनांक 26 May 2020 वेळ 8:15 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » रस्त्यांवरील विद्युत खांबांमुळे बोईसर-चिल्हार रस्ता ठरतोय धोकादायक

रस्त्यांवरील विद्युत खांबांमुळे बोईसर-चिल्हार रस्ता ठरतोय धोकादायक

वार्ताहर/बोईसर, दि. 9 : बोईसर शहरासह तारापूर औद्योगिक वसाहतीला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार्‍या बोईसर-चिल्हार रस्त्याचे मागील 2 वर्षांपासुन चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र चौपदरीकरण करत असताना रस्त्यालगतचे विद्युत खांब हटवले नसल्याने अडथळा निर्माण होत असुन हा रस्ता वाहतूकीस धोकादयक ठरत आहे.

तारापूर औद्योगिक वसाहत ही देशभारतील सर्वात मोठ्या औद्यागिक वसाहतीत गणली जाणारी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर हलक्या व अवजड वाहनांची रेलचेल असते. या वाहनांना मुंबई-अहमदाबाद महामार्गाशी जोडण्यासाठी एकमेव असा बोईसर-चिल्हार रस्ता असल्याने मागील 2 वर्षांपासुन या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. 17 किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्याचे जवळपास 50 टक्के काम पुर्ण झाले आहे. मात्र रुंदीकरण करताना या रस्त्याशेजारी असलेले पुर्वीचे जुने विद्युत खांब हलवले नसल्याने जागोजागी या खांबांमुळे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. विद्युत खांबांसह काही ठिकाणी झाडेही तोडली नसल्याने तसेच दुभाजक टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता धोकादायक बनला असुन वाहनचालकांना जीव मुठीत धरुन येथून प्रवास करावा लागत आहे.

2015 साली महावितरण कंपनीकडून रस्त्यावरील हे जुने खांब स्थलांतरीत करण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र या कामासाठी 4 वेळा निविदा प्रकिया राबवूनही कोणताही ठेकेदार हे काम करण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम थांबू नये या उद्देशाने जागोजागी विद्युत खांब तसेच ठेऊन रस्त्याचे काम पुर्ण करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपघात घडू नये याकरिता उपाययोजना म्हणून या विद्युत खांबांना रेडियमच्या पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, विद्युत खांब स्थलांतरीत करण्यासाठी मागील वर्षी सुधारित अंदाजपत्रक काढून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे व याकामी ठेकेदार देखील उपलब्ध झाला असल्याचे एमआयडीसीचे उप अभियंता चंद्रकांत भगत यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top