दिनांक 25 August 2019 वेळ 1:43 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पाचघर गाव तहानेने व्याकुळ, हंडाभर पाण्यासाठी जागून काढावी लागतेय रात्र

पाचघर गाव तहानेने व्याकुळ, हंडाभर पाण्यासाठी जागून काढावी लागतेय रात्र

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या पाचघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे महिलांना संपुर्ण दिवसच पाण्यासाठी खर्ची करावा लागत आहे. येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील वर्षी परतीच्या पावसाने दडी मारल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीसंकट ओढवले आहे. त्यातच पाण्याची पातळी देखील खुपच खाली गेल्याने गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तर शासकीय नळ योजनांचा उडालेला बोजवारा पाणीसंकटात आणखीच भर घालत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.

पाचघर हे गाव अतिदुर्गम भागामध्ये येत असून शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेला डोंगर दर्‍यांचा हा भाग आहे. या गावाची लोकसंख्या 550 च्या आसपास आहे. येथील विहिरींनी एप्रिल अखेरपर्यंत तळ गाठला असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. ग्रामस्थांनी पाणी पुरवठा विभागाकडे अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर पाचघर गावाला आजपासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी सांगितले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top