दिनांक 03 July 2020 वेळ 4:01 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर : 12 लाखाहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क!

पालघर : 12 लाखाहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क!

63.72 टक्के मतदानाची नोंद

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आपल्या कुटुंबासह वाड्यातील जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथील मतदान केंद्र १९ वर मतदान केले. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी देसई येथील मतदान केंद्रावर मतदान केले. वाड्याच्या प्रथम नागरिक गितांजली कोलेकर यांनी वाड्यातील उर्दू शाळा मतदान केंद्र १२ वर मतदान केले. 

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 30 : काल, 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत 63.72 टक्के मतदान झाले असुन एकुण 18 लाख 85 हजार 297 मतदारांपैकी 12 लाख 1 हजार 298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार आपले नशिब आजमावत असुन 23 मे रोजी होणार्‍या मतमोजणीनंतर मतदारांनी नक्की कुणाच्या पारड्यात सर्वाधिक मते टाकली हे स्पष्ट होणार आहे.

पालघर लोकसभा मतदार संघासाठी एकुण 2 हजार 177 मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले. या मतदारसंघातील 18 लाख 85 हजार 297 मतदारांमध्ये 9 लाख 88 हजार 997 पुरुष, 8 लाख 96 हजार 189 महिला व इतर 111 मतदारांचा समावेश आहे. विधानसभानिहाय आकडेवारीनुसार विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच 2 लाख 64 हजार 132 मतदारांपैकी 1 लाख 83 हजार 584 (69.50 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर त्याखालोखाल पालघर विधानसभा क्षेत्रात 2 लाख 71 हजार 167 मतदारांपैकी 1 लाख 85 हजार 943 (68.57 टक्के), बोईसर विधानसभा क्षेत्रात 2 लाख 97 हजार 915 मतदारांपैकी 2 लाख 4 हजार 49 (68.49 टक्के), डहाणू विधानसभा क्षेत्रात 2 लाख 69 हजार 988 मतदारांपैकी 1 लाख 81 हजार 252 (67.13 टक्के), वसई विधानसभा क्षेत्रात 2 लाख 94 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 92 हजार 157 (65.24 टक्के) तर नालासोपारा विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी म्हणजेच 4 लाख 87 हजार 560 मतदारांपैकी 2 लाख 54 हजार 313 (52.16 टक्के) मतदारांनी मतदान केले.

पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राजेंद्र धेड्या गावीत, बहुजन विकास आघाडीचे बळीराम सुकुर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश अर्जून पाडवी, बहुजन समाज पार्टीचे संजय लक्ष्मण तांबडा, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय रामा कोहकेरा, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (रेड फ्लॅग) चे कॉम्रेड शंकर बदादे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराम झिपर कुरकूटे यांच्यासह दत्ताराम जयराम करबट, भोंडवे ताई मारूती, राजू दामू लडे, विष्णू काकड्या पाडवी व स्वप्नील महादेव कोळी असे पाच अपक्ष उमेदवार मिळुन 12 उमेदवार आपले नशिब आजमावत असले तरी भाजप शिवसेना युतीचे राजेंद्र गावीत व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा लाभलेले बहूजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यातच खरी लढत असल्याचे मानले जात आहे. मात्र 23 मे रोजी होणार्‍या मतमोजणी नंतरच खरे चित्र समोर येणार आहे.

दरम्यान, मतदार यादीतून मतदारांची नावे गायब असणे, काही मतदारांची नावे चुकीची तर काही नावे दूबारा आल्याचे प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top