दिनांक 25 August 2019 वेळ 2:02 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विरारमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

विरारमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 18 : एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना विरार येथे घडली असुन या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी पीडित मुलीसह तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राला एका आंब्याचा झाडाला बांधुन आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 15) रात्री 8 वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी आपल्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र नातेवाईकांच्या बिल्डिंगखाली तिला तिचा मित्र भेटल्याने दोघे बोलत बोलत कै. भास्कर वामन ठाकुर शाळेकडे पोहोचले असता आजुबाजुला कुणीही नसल्याचे हेरत दोन इसम त्यांच्याकडे आले व त्यांनी पिडीता व तिच्या मित्राला ओढत निर्जण स्थळी नेले. यावेळी तिच्या मित्राला एकाने मारहाण करत दोघांनाही आंब्याच्या झाडाला बांधले तसेच आरडाओरड केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देत पिडीतेवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी दोघांनाही तशाच स्थितीत सोडून तेथून पळ काढला. दोघांनी तेथून कशीबशी आपली सुटका करत घरी पोहोचून कुटूंबियांना हा प्रकार सांगितल्यानंतर मंगळवारी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पीडित मुलीने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात, दोन्ही आरोपींनी ऑटो रिक्षा चालक घालतात त्या रंगाची पँट घातली होती व त्यातील एकाच्या पँटीला त्रिकोणी रंगाचा बिल्लाही लटकलेला होता, अशी माहिती दिल्याने पोलिसांनी परिसरातील रिक्षाचालकांची चौकशी सुरु केली आहे.

डहाणू : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

डहाणू, दि. 18 : 27 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास कुटूंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या तरुणाविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळची घोलवड येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी कामानिमित्त अंधेरी येथे रहावयास असुन तिचे मागील 4 वर्षांपासुन डहाणूतील एका तरुणासोबत प्रमसंबंध होते. यादरम्यान तरुणाने तिला लग्नाचे आश्‍वासन देऊन वेळोवळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र पीडितेने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला असता त्याने लग्नास नकार देतानाच घडल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केल्यास कुटूंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने याबाबत अंधेरीतील दा. नौ. नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन हे प्रकरण डहाणू पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. डहाणू पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top