दिनांक 25 August 2019 वेळ 2:14 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोर : महिलेची क्रुर हत्या, शरीराचे केले तुकडे

मनोर : महिलेची क्रुर हत्या, शरीराचे केले तुकडे

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 18 : महिलेची क्रुरपणे हत्या करुन पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या शरीरिचे तुकडे करुन इतरत्र फेकल्याची धक्कादायक घटना मनोर येथे उघडकीस आली आहे. दरम्यान, मृतदेहाचे डोके व इतर भाग शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत असुन सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे

काल, बुधवारी (दि. 18) येथील एका शेतकर्‍याला रस्त्याच्या कडेला गाउनमध्ये गुंडाळलेले महिलेचे धड आढळून आले. याबाबत पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता मृत महिलेच्या छातीवर व पोटावर गंभीर जखमा दिसुन आल्या. तसेच आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे डोके, दोन्ही हात व दोन्ही पाय कापुन त्यांची अन्य ठिकाणी विल्हेवाट लावल्याचे दिसुन आले. यानंतर पोलीसांनी मृत महिलेचे धड ताब्यात घेत अधिक तपास सुरु केला असुन शरीराचे इतर भाग शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top