दिनांक 05 December 2019 वेळ 8:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मत मागण्यापूर्वी उमेदवारांनी उत्तरे द्या; मोखाडा भू-पाणी हक्क संघर्ष समितीची अट

मत मागण्यापूर्वी उमेदवारांनी उत्तरे द्या; मोखाडा भू-पाणी हक्क संघर्ष समितीची अट

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मोखाडा, दि. 17 : येत्या लोकसभा निवडणूकीसाठी मते मागण्यासाठी मोखाडा तालुक्यात जाताना उमेदवारांना प्रथम काही प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावी लागणार आहेत. मोखाडा भू-पाणी हक्क संघर्ष समितीने तशी अट टाकली असून गावाच्या वेशीवर याबाबतचा फलक लावला आहे.

त्यांचे प्रश्न असे आहेत :-
  • दमणगंगा – वैतरणा – गोदावरी नदीजोड प्रकल्पाला तुम्ही विरोध करता का?
  • तुम्ही सत्तेत आलात तर सदर प्रकल्प रद्द करण्यात येईल याची हमी देता का?
  • संपूर्ण मोखाडा तालुक्याला पाणी पुरवणारी अप्पर वैतरणा पिण्याचे पाणी योजना कराल याची हमी देता का?

याबाबत जनजागृती करण्यासाठी मोखाडा भू पाणी हक्क संघर्ष समितीतर्फे मोखाडा बाजारपेठेत फेरी काढण्यात आली. यानंतर झालेल्या सभेमध्ये उमेदवारांकडून लेखी मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top