दिनांक 05 December 2019 वेळ 8:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. विजय चोरडिया

डहाणू : ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. विजय चोरडिया

ॲड. विजय चोरडिया
ॲड. शेखर जोशी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. १७ : येथील डहाणू व तलासरी तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विजय चोरडिया तर सेक्रेटरीपदावर ॲड. शेखर जोशी यांची एकमताने निवड झाली आहे. काल (मंगळवार) डहाणू येथील न्यायालयात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

डहाणू न्यायालय व ॲडव्होकेट बार असोसिएशनला मोठी ऐतिहासिक परंपरा असून १९५१ पासून वकिली करणारे असोसिएशनचे सर्वात ज्येष्ठ सदस्य विधिज्ञ सी. एम. बोथरा, १९६८ पासून वकिली करणारे विधिज्ञ प्रकाश करंदीकर हे आजही असोसिएशनचे सक्रिय सदस्य आहेत व त्यांचे मार्गदर्शन बार असोसिएशनला लाभत असते. या दोन्ही ज्येष्ठ विधिज्ञांनी बैठकीला उपस्थिती लावून मार्गदर्शन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top