दिनांक 05 December 2019 वेळ 8:27 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार व डहाणू आदिवासी प्रकल्पातील घोटाळ्यांची मालिका संपेना!

जव्हार व डहाणू आदिवासी प्रकल्पातील घोटाळ्यांची मालिका संपेना!

आणखी पावणे दोन कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी गुन्हे दाखल!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : जव्हार व डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात 2004 ते 2009 दरम्यान आदिवासींसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमधील कोट्यावधींच्या घोटाळ्यांची अनेक प्रकरणे मागील काही दिवसांपासुन उजेडात येत असुन आता आणखी पावणे दोन कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी संबंधित अधिकारी व संस्थांविरोधात काल, मंगळवारी जव्हार व डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जव्हार आदिवासी प्रकल्पात सन 2004 ते 2009 दरम्यान आदिवासी लाभार्थ्यांना पेट्रोलपंप व गॅस युनिट वाटप योजनमध्ये सर्वाधिक 1 कोटी 71 लाख 80 हजार 225 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे मोखाडा उपप्रादेशिक कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी काल, जव्हार पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण योजनेत 1 लाख 92 हजार रुपयांचा घोटाळा झाला आहे. तर डहाणू आदिवासी प्रकल्पातील घोटाळ्यांच्या पार्श्‍वभुमीवर नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील तरुणांना ऑक्रेस्ट्रासाठी संगित वाद्ये देण्याच्या योजनेत 2 लाख 55 हजार रुपयांचा, युवकांना टंकलेखन प्रशिक्षण योजनेत 78 हजार 750 रुपयांचा व गरीब आदिम जमातीच्या कातकरी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या जनश्री विमा योजनेत 38 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असुन याप्रकरणी बड्या अधिकार्‍यांसह पालघरमधील अष्टविनायक टायपिंग इन्स्टिटयुट व जांभुळगाव एकता मंडळाविरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 420 व 409 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, एकामागेमाग उघडकीस येत असलेल्या या घोटाळ्यांचा आकडा पाच कोटींच्याही पुढे गेला असुन यापुर्वीच जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील माजी प्रकल्प अधिकारी आय. एन. खाटीक यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील तत्कालीन अपर आयुक्त, नवी मुंबईतील इंडो इस्त्राईल अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजचा अध्यक्ष आदींसह नाशिक येथील जोशाबा स्वयंराजेगार संस्था, विक्रमगड येथील श्रीराम इन्स्टिट्यूट संस्था व शिवणयंत्र पुरवठा करणारी भुसावळ येथील जैन अ‍ॅण्ड कंपनी यांच्या संचालकांविरोधात

comments

About Rajtantra

Scroll To Top