दिनांक 18 June 2019 वेळ 6:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महावीर जयंती निमित्त मोखाड्यात धान्यवाटप

महावीर जयंती निमित्त मोखाड्यात धान्यवाटप

आशाये ग्रुप व डॉ. कडव यांचा संयुक्त उपक्रम

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 17 : महावीर जयंतीचे औचित्त्य साधून तालुक्यातील मारूतीचीवाडी परिसरातील तीन गावपाड्यांना ठाणे – नौपाडा स्थित आशाये ग्रुप व डॉ. मिठाराम कडव यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यवाटप करण्यात आले. मारूतीचीवाडी व बोरशेती परिसरातील 151 कुटूंबांनी या धान्यवाटपाचा लाभ घेतला.

मोखाडा तालुक्यातील निष्कांचन परिस्थिती लक्षात घेऊन ग्रुपचे परेशभाई गाला व कृणाल विसरीया यांनी डॉ. मिठाराम कडव यांच्याकडे दारिद्य्र रेषेखालील कुटूंबांना धान्य वाटपाचा मनोदय बोलून दाखवला होता. त्यानुसार आज, बुधवारी महावीर जयंतीचे औचित्य साधून परिसरातील 151 गरिब कुटूंबांना महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, दाळी व इतर धान्यांचे वाटप करण्यात आले. या धान्यवाटप उपक्रमामुळे दारिद्र रेषेखालील कुटूंबांची किमान महिनाभराची ददात मिटल्याने त्यांच्या चेहेर्‍यावर समाधान झळकत होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top