दिनांक 21 October 2019 वेळ 3:28 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचविणार्‍या सरकारी वकीलांचा सत्कार

आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचविणार्‍या सरकारी वकीलांचा सत्कार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 16 : एका महिलेच्या हत्येप्रकरणी वसई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात सरकारतर्फे भक्कम बाजु मांडतांनाच आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार्‍या सरकारी वकील श्रीम. खंडागळे व श्री. जयप्रकाश पाटील यांचा आज पालघर पोलीस दलाने सत्कार केला

तीन वर्षांपुर्वी राजेंद्र शाम सावंत (वय 48) या आरोपीने एका महिलेच्या पोटात चाकु खुपसुन तिची हत्या केली होती. तसेच या हल्ल्यावेळी सदर महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या अन्य एका महिलेवरही त्याने चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी आरोपीविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक पोतदार यांनी याप्रकरणी अधिक तपास करत आरोपीविरोधात वसई सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील श्रीम. खंडागळे व श्री. जयप्रकाश पाटील यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर सरकारची बाजू भक्कमपणे मांडल्याने कोर्टाने आरोपी राजेंद्र सावंत याला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे या खटल्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या वकील श्रीम. खंडागळे व श्री. जयप्रकाश पाटील यांचा आज, मंगळवारी तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरिक्षक परदेशी व सांळुखे तसेच पोलीस नाईक सुनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top