दिनांक 18 April 2019 वेळ 8:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसर : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

बोईसर : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

आरोपीविरोधात बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : आदिवासी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणार्‍या व नंतर लग्नास नकार देणार्‍या एका तरुणाविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शिगाव-वाणीपाडा भागात राहावयास असलेल्या 23 वर्षीय आदिवासी तरुणीचे इतर समाजातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून 2 वर्षांपासुन सदर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत पिडीत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र मागील काही महिन्यांपासुन पिडीतेने त्याच्याकडे लग्नाचा दागादा लावला असता त्याने तिला लग्नास नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर पिडीतेने बोईसर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर तरुणाविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 376 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम 3(1)(आर)(एस)(डब्लू) व नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु केला आहे.

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणं बलात्कारच! -सुप्रीम कोर्ट

दरम्यान, लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बलात्कारच आहे, असं केल्याने महिलेच्या सन्मानाला धक्का लागतो, असं मत आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने छत्तीसगडमधील एका बलात्कार प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला. लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा आरोपी आपल्या जीवनात पुढे निघून जातो, ही घटना विसरुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो. मात्र याचा अर्थ हा नाही की त्याच्याकडून गुन्हा झालेला नाही. त्याच्या वागणुकीला नेहमी गुन्हाच समजलं जाईल, असंही न्यायालयाने म्हटलं.

comments

About Rajtantra

Scroll To Top