दिनांक 18 April 2019 वेळ 8:01 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » शितला देवीचे दर्शन घेऊन राजेंद्र गावितांच्या प्रचाराला सुरुवात

शितला देवीचे दर्शन घेऊन राजेंद्र गावितांच्या प्रचाराला सुरुवात

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : पालघर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज केळवा येथील शितला देवी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, उपजिल्हा प्रमुख राजेश कुट्ट, पालघर विधानसभा प्रमुख वैभव संखे, आरपीआयचे जिल्हाअध्यक्ष सुरेश जाधव, तालुका प्रमुख विकास मोरे, तालुका संघटक नीलम म्हात्रे, विधानसभा अध्यक्ष सुजित पाटील, युवा सेनेचे परीक्षित पाटील आदींसह महायुतीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटताच पालघर तालुक्यातील केळवा, माहिम, वडराई, शिरगाव, सातपाटी, पालघर, उमरोळी, सरावली, सालवड, मुरबे, पाचमार्ग, कुडण, तारापूर आदी गावांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे.

12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, पालघर मतदारसंघात नामनिर्देशन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 12 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात राजेंद्र धेड्या गावित (शिवसेना), संजय लक्ष्मण तांबडा (बहुजन समाज पार्टी), देवराम झिपर कुरकूटे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), बळीराम सुकुर जाधव (बहुजन विकास आघाडी), कॉम्रेड शंकर बदादे (मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया- रेड फ्लॅग), सुरेश अर्जून पाडवी (वंचित बहुजन आघाडी), संजय रामा कोहकेरा (बहुजन मुक्ती पार्टी), दत्ताराम जयराम करबट (अपक्ष), भोंडवे ताई मारूती (अपक्ष), राजू दामू लडे (अपक्ष), विष्णू काकड्या पाडवी (अपक्ष) व स्वप्नील महादेव कोळी (अपक्ष) यांचा समावेश आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top