दिनांक 24 February 2020 वेळ 7:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जव्हार आगारातून 6 ज्यादा बसेस

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जव्हार आगारातून 6 ज्यादा बसेस

प्रतिनिधी/जव्हार, दि. 12 : सुट्ट्या व गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे राज्यभरात जादा एसटी बसेस सोडण्यात येत असुन जव्हार एसटी आगारातूनही 6 ज्यादा बसेस सोडण्यास सुरुवात झाली आहे.

गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी अशी ओळख असलेली एसटी बस दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत असते. सामान्य, गरीब व शेतकर्‍यांसाठी हक्काचे प्रवासाचे साधन म्हणजे एसटी. पालघर जिल्ह्यातील जव्हार एसटी आगार तालुक्यातील विविध भागांसह मोखाडा, खोडाळा, विक्रमगड आदी दुर्गम भागात सेवा बजावत आहे. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असुन प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी त्रास होऊ नये तसेच त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून यावर्षी जव्हार एसटी आगारातून 6 जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी या जादा वाहतूकीचा लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक सरिता पाटील यांनी केले आहे.

ज्यादा बस सेवा व त्यांचे वेळापत्रक :

जव्हार-धुळे (सकाळी 7 वाजता)
जव्हार-धुळे (सकाळी 11.30 वाजता)
जव्हार-औरंगाबाद (सकाळी 5.30 वाजता)
जव्हार-ठाणे (मलवाडा मार्गे- सकाळी 10.30 वाजता)
जव्हार- ठाणे (हायवे मार्गे-सकाळी 11.00 वाजता)
जव्हार-बोईसर (सकाळी 8.00 वाजता)

comments

About Rajtantra

Scroll To Top