दिनांक 18 June 2019 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » तलासरीत नाकाबंदीदरम्यान लाखोंचा गुटखा व रेती जप्त

तलासरीत नाकाबंदीदरम्यान लाखोंचा गुटखा व रेती जप्त

एकुण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 12 : तलासरी पोलीसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमधुन 4 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा तसेच रेतीवाहतूक करणार्‍या एका ट्रकमधुन 30 हजार रुपयांची रेती जप्त केली आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्सचालक व त्याचे 4 साथिदार तसेच ट्रकचालक अशा एकुण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल, गुरुवारी महामार्गावरील आच्छाड चेकपोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करत असताना जी.जे. 14/व्ही. 5130 या क्रमांकाच्या खाजगी बसमध्ये गोणींमध्ये भरलेला 4 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांना आढळून आला. यांनतर पोलिसांनी गुटखा व बस जप्त करत बसचालक इब्राहिम रजपशहा बेलिम (वय 24) व त्याचे साथिदार तोशिफ इजाईभाई नाया (वय 25, दोघे रा. गुजरात), गौतम भूपेन्द्र चौधरी (वय 26, रा. दहिसर, मुंबई), योगेश जयशंकर दुबे (वय 18, रा. कांदिवली, मुंबई), पुणीत राजकिशन दूबे (वय 33, रा. मालाड, मुंबई) अशा एकुण 5 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर दापचरी गावच्या हद्दीत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणार्‍या जी.जे. 05/वाय. वाय. 7708 या क्रमांकाच्या ट्रकवर पोलीसांनी कारवाई करत ट्रकसह 30 हजार रुपये किंमतीची रेती जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी ट्रकचालक रामविलास फूलसिंग कुशवाह (वय 40 वर्षे, रा. वलसाड) याला अटक करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

कासा : पान टपरीतून 40 हजाराचा गुटखा जप्त

डहाणू, दि. 12 : महामार्गावरील कासा हद्दीतील अतिथी हॉटेलसमोर असलेल्या एका पान टपरीत विक्रीसाठी ठेवलेला 40 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी काल, गुरुवारी कारवाई करत जप्त केला असुन याप्रकरणी टपरी चालक पंकज छोटेलाल ठठेरा (वय 24, रा. चारोटी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी पंकज ठठेरा विरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top