दिनांक 18 June 2019 वेळ 6:30 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सराईत चोरट्यांची टोळी गजाआड, चोरी व घरफोडीचे 20 गुन्हे उघड

सराईत चोरट्यांची टोळी गजाआड, चोरी व घरफोडीचे 20 गुन्हे उघड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 12 : वसई तालुक्यातील विविध भागात घरफोड्या, मोबाईल व वाहनांची चोरी करुन धुमाकुळ घालणार्‍या सराईत चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात विरार पोलीसांच्या पथकाला यश आले असुन या चोरट्यांकडून एकुण 4 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

विरार पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी व चोरींच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभुमीवर पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने मागील काही दिवसांत घरफोडी व चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज गोळा करुन त्याआधारे आपला तपास सुरु केला होता. या पथकाने तपासादरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या चौकशीतून विरार, नालासोपारा व वसई हद्दीत घडलेल्या एकुण 20 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असुन 3 दुचाकी, 2 लॅपटाप, 45 मोबाईल फोन, टिव्ही, फॅन, मिक्स, किराणा माल, सौंदर्य प्रसाधने असा एकुण 4 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.

विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल दबडे व पोलीस निरिक्षक विवेक सोनवणे यांच्या विशेष गुन्हे पथकातील पोलीस कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top