दिनांक 18 June 2019 वेळ 6:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डॉ. मनीष हिंदुजा यांचे हृदयविकारांवर मार्गदर्शन

डॉ. मनीष हिंदुजा यांचे हृदयविकारांवर मार्गदर्शन

प्रतिनिधी/पालघर, दि. 10 : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे लायन्स क्लब ऑफ पालघर येथे हृदयविकारांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक व कार्डिओ व्हेस्कुलर सर्जन डॉ. मनीष हिंदुजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या छातीला कमीत कमी छेद देऊन केल्या जाणार्‍या आधुनिक व प्रगत बायपास शल्यचिकित्सेविषयी (मिनीमली इन्व्हासिव्हकार्डियाक सर्जरी) माहिती दिली

बायपास सर्जरी झालेल्या व्यक्तीला जवळजवळ एक महिना हॉस्पिटलमध्ये रहावेच लागते. तसेच घरी आल्यावर सुद्धा एक महिन्याभर आराम करावा लागतो व त्यानंतर तो रुग्ण बाहेर हिंडू फिरू शकतो. परंतु मिनीमली इन्व्हासिव्हकार्डियाक सर्जरी झालेला रुग्ण 8 दिवसात घरी जाऊ शकतो व पुढील 8 दिवसात तो आपल्या नोकरीवर रुजू देखील होऊ शकतो. सोपी व कमी जोखमीची पण रुग्णाला आयुष्य देणारी आणि चांगले आयुष्य जगण्यास मदत करणारी अशी ही शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉ. हिंदुजा यांनी दिली

यावेळी बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी म्हणाले की, मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील मिनीमली इन्व्हासिव्ह कार्डियाक सर्जरीच्या तंत्रज्ञानामुळे पश्चिम उपनगरातील (अंधेरी ते थेट पालघर) नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करण्यासाठी 9 वर्षांचा अनुभव व पाच हजार शल्यचिकित्सा करणारे वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये रुजू झालेले हृदय शल्यचिकित्सक डॉ. मनीष हिंदुजा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक व कार्डिओ व्हेस्कुलर सर्जन असून त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा फायदा मीरा रोड ते पालघर येथे राहत असलेल्या नागरिकांना होणार आहे.

मिनीमली इन्व्हासिव्ह कार्डियाक शल्यचिकित्सा शस्त्रक्रिया करताना 20 सेंटीमीटर ऐवजी फक्त 7 ते 8 सेंटीमीटर छिद्र केले जाते. या तंत्रज्ञानाद्वारे बाईपास ग्राफ्टिंग, हृदयाच्या वॉल्वची दुरुस्ती किंवा प्रतिस्थापना, हृदयातील छिद्र बंद करणे अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया कमी वेळात करता येणार आहे. या हृदयशस्त्रक्रियेत छातीच्या हाडाला कोणतीही दुखापत होत नसल्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. भारतातील 16 टक्के मृत्यूंचे हृदयविकार हे कारण असून मृत्यू जर कमी करायचे असतील तर मिनीमली इन्व्हासिव्ह कार्डियाक सर्जरीचे तंत्रज्ञान हे त्याचे उत्तर ठरू शकेल, असा दावा डॉ. हिंदुजा यांनी यावेळी बोलताना केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top