दिनांक 18 June 2019 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अखेर वाड्याच्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न सुटला

अखेर वाड्याच्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न सुटला

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी नगराध्यक्षांच्या घरासमोर कचर्‍याने भरलेल्या गाड्या उभ्या केल्यामुळे तापलेला वाडा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्‍न अखेर सुटला असुन नगरपंचायतीच्या बैठकीत एकमताने डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून वाड्यातील कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे ठीक-ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले होते. तर दुर्गंधी व जाळलेल्या कचर्‍याच्या धुरामुळे रोगराई पसरण्याची लक्षणे दिसत होती. या पार्श्‍वभुमीवर काल, बुधवारी वाडा नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांनी एकत्रित बैठक घेऊन एकमताने जयंत पवार यांच्या जागेत कचरा एकत्र करून योग्य ती विल्हेवाट लावण्याचे ठरवल्याने गुरुवारी सकाळपासून शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती कचरा व्यवस्थापन समितीचे सभापती वशिम शेख यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा साठवण्याचे आवाहन करत प्लास्टिक बंदीबाबत मुख्याधिकार्‍यांनी सूचना दिल्या आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top