दिनांक 25 August 2019 वेळ 1:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » निवडणूक निरीक्षक पालघरमध्ये दाखल

निवडणूक निरीक्षक पालघरमध्ये दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 10 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून रविंद्रा पी. एन. यांची नियुक्ती करण्यात आली असुन काल, मंगळवारी त्यांनी पालघरमध्ये दाखल होत निवडणूक यंत्रणेच्या तयारीचा प्राथमिक आढावा घेतला

रविंद्रा पी. एन. सकाळी 11 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नागरीकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. नागरीकांना त्यांच्याशी 7507705604 या मोबाईल क्रमांकावरुन अथवा ीर्रींळपवीरज्ञरी.ीसिारळश्र.लेा या ईमेलच्या माध्यमातून देखील संपर्क साधता येईल. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. भागिरथी गवारकर यांची तर पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून आनंदकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरीकांना गवारकर यांच्याशी 7507706507 या क्रमांकावरुन तसेच आनंदकुमार यांच्याशी 7507705220 या मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधता येईल, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top