दिनांक 25 August 2019 वेळ 2:01 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 11 उमेदवारांनी दाखल केले अर्ज

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : पालघर लोकसभा मतदार संघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनता दल महाआघाडीचे उमेदवार माजी खासदार बळीराम जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जाधव यांच्यासह आज एकुण 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

उद्या दि. 10 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. तसेच 29 एप्रिल रोजी मतदान व 23 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष पुढीलप्रमाणे :-

राजेंद्र धेंड्या गावितशिवसेना
बळीराम सुकुर जाधव व राजेश रघुनाथ पाटीलबहुजन विकास आघाडी
सुरेश अर्जून पाडवीवंचित बहुजन आघाडी
संजय लक्ष्मण तांबडा बहुजन समाज पार्टी
सचिन दामोदर शिंगडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष
शंकर भागा बदादे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
राजू दामू लडे व चेतन दत्तात्रेय पाटीलबहुजन महापार्टी
देवराम झिपर कुरकूटेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
संजय रामा कोहकेराबहुजन मुक्ती पार्टी
ताई मारूती भोंडवे अपक्ष
विष्णू काकड्या पाडवीअपक्ष
अमर किसन कवळेअपक्ष
दत्ताराम जयराम करबटअपक्ष
स्वप्नील महादेव कोळी अपक्ष
काकड लुईस सुखाडअपक्ष
विनोद कृष्णा भावरअपक्ष
प्रमोद मावंजी मौळेअपक्ष
रोहन भरत वेडगाअपक्ष
दत्ता बाबू सांबरे अपक्ष

comments

About Rajtantra

Scroll To Top