दिनांक 18 January 2020 वेळ 12:32 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसई : अज्ञात महिलेचा मुंडके छाटून निर्घुण खून

वसई : अज्ञात महिलेचा मुंडके छाटून निर्घुण खून

फाईल चित्र

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 9 : तालुक्यातील नायगाव पुर्व भागातील खाडीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असुन सदर महिलेचा मुंडके छाटून निर्घुण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात खून्याविरोधात गुन्हा दाखल केला असुन मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव पुर्वेतील मालजीपाडा गावच्या हद्दीत असलेल्या खाडीत काल, सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास एका 53 वर्षीय इसमाला सदर मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता आरोपीने सदर महिलेचे मंडुके छाटून ते धडापासुन वेगळे केल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोटाला दगड झालेल्या सिमेंटची गोणी बांधुन धड खाडीत फेकल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302 व 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top