दिनांक 18 November 2019 वेळ 1:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मतदार जागृती अभियानांतर्गत पालघर येथे ‘मी मतदान करणारच’ मोहीम

मतदार जागृती अभियानांतर्गत पालघर येथे ‘मी मतदान करणारच’ मोहीम

लोकशाहीच्या महापर्वात सर्वांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे आवाहन

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 07 : पालघर लोकसभेच्या पालघर विधानसभा मतदार संघात काल, शनिवारी मी मतदान करणारच मोहीम राबविण्यात आली. पालघर रेल्वे स्थानकात मी मतदान करणारच या विशेष बॅनरवर सह्या करून मोठ्या संख्येने नागरिकांनी या जनजागृती अभियानात सहभाग नोंदविला. पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या लोकसभा महापर्वात सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.

पालघर लोकसभेसाठी येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल पालघर रेल्वे स्थानकात रहिवाशांच्या सह्यांची मोहीम घेऊन प्रत्येकाने मतदान केले पाहिजे हा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला पालघरचे तहसिलदार महेश सागर, नायब तहसिलदार मनिषा पिंपळे, श्री. गडग यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top