दिनांक 20 February 2020 वेळ 10:19 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » निवडणूक वार्तापत्र: (गुढीपाडवा, दि. ६ एप्रिल २०१९) एक नजर पालघर लोकसभा मतदार संघावर

निवडणूक वार्तापत्र: (गुढीपाडवा, दि. ६ एप्रिल २०१९) एक नजर पालघर लोकसभा मतदार संघावर

For enquiry Call Mr. Ajay Bhagat @ 9987564702

पालघर, दि. ६ एप्रिल २०१९; गुढीपाडवा:- (संजीव जोशी) पालघर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ असून येथे २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. मतदारसंघात १८ लाख १२ हजार ९८३ मतदारांचा समावेश असून त्यामध्ये ९ लाख ४९ हजार ५९२ पुरुष व ८ लाख ६३ हजार ३०१ महिला आणि ९० तृतियपंथियांचा समावेश आहे. यातील ३ हजार सहाशे ८२ मतदार अपंग असून त्यांना मतदान केंद्रावर सहज जाता यावे यासाठी आवश्यकतेनुसार व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. मतदारसंघात २ हजार एकशे ७७ मतदान केंद्रे असणार आहेत.

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत येथून कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणारे वणगांचे बंडखोर पुत्र श्रीनिवास यांचा पराभव केला होता. बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर कॉंग्रेसचे दामू शिंगाडा यांना अनामत रक्कम वाचवता आली नव्हती. लोकसभा मतदारसंघ हा ६ विधानसभा मतदारसंघातून विभागला गेला असून त्यातील वसई, नालासोपारा व बोईसर या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी प्रतिनिधित्व करीत आहे. विक्रमगड व डहाणू मतदारसंघ भाजपाकडे तर पालघर मतदारसंघ शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केला जात आहे.


आता भाजप व शिवसेनेत युती झाली असून हा मतदारसंघ शिवसेनेने स्वतःकडे मागून घेतला असला तरी श्रीनिवास वणगाला स्पर्धेतून बाहेर टाकून भाजपचे रेडीमेड खासदार राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिली आहे. या विचित्र तडजोडीमध्ये गावीत यांना वर्षभरात तिसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागला आहे. सेना भाजपच्या या विदुषकी डावपेचावर मात करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने कंबर कसली असून त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. असे असले तरी ज्या बहुजन महापार्टीच्या शिट्टी या निशाणीवर बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवते त्या पक्षाने पालघर मध्ये शिट्टी या निशाणीवर स्वतंत्र उमेदवार उभा करुन बहुजन विकास आघाडीसमोर अडचण उभी केली आहे. बहुजन विकास आघाडीला नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असून हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवणे व पारंपारिक मते शिट्टीवर पडू नयेत ही आव्हाने पेलावी लागणार आहेत.


आज रोजी पर्यंत निवडणूकीसाठी २८ जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले असून सेना भाजप युतीतर्फे राजेंद्र गावीत, बहुजन महापार्टी तर्फे राजू दामू लाडे, वंचीत बहुजन आघाडीतर्फे सुरेश अर्जून पाडवी यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरायची ९ एप्रिल ही अखेरची तारीख आहे. मतदारसंघात आदर्श आचारसंहिता भंगाचे ३ गुन्हे दाखल झाले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top