दिनांक 18 January 2020 वेळ 11:12 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणु : पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला 8 वर्षांचा कारावास

डहाणु : पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला 8 वर्षांचा कारावास

5 वर्षांपुर्वी केला होता खून.

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 3 : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणार्‍या व यावरुन नेहमी वाद घालणार्‍या पत्नीचा गळफास देऊन खून करणार्‍या पतीला न्यायालयाने 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असुन (बाबु गणपत गहला, रा. जामशेत, डहाणू) असे आरोपीचे नाव आहे. 5 वर्षांपुर्वी ही घटना घडली होती.

बाबु गहला याचे गावातील अन्य एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही बाब त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. नेहमीच्या वादामुळे संतापलेल्या बाबू गहला याने पत्नीला मारहाण करत सावरपाडा रस्त्याशेजारील एका सागाच्या झाडाला गळफास देत तिचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात डहाणु पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नागेश जाधव यांनी याप्रकरणी अधिक तपास करत सबळ पुराव्यांसहित आरोपी बाबू गहलाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी बाबू गहला याला 8 वर्षे सश्रम कारावास व 1500 रुपये द्रव्यदंडांची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षेनंतर आरोपीची ठाणे येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

विवाहितेवर बलात्कार, आरोपीला 3 वर्षांची शिक्षा

डहाणु, दि. 3 : विवाहितेवर बलात्कार करुन व याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या पतीला मारहाण करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सुनिल तालूकादार गौतम, (वय 35) असे आरोपीचे नाव असुन 3 वर्षांपुर्वी त्याने पिडीतेवर बलात्कार केला होता.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला वडकून रस्त्यावरुन पायी चालत जात असताना सुनिल गौतम याने जबरदस्तीने तिला येथील लादी कंपनीच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात नेऊन बलात्कार केला होता. यानंतर पिडीत महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितल्यानंतर दोघांनीही गौतम याला गाठत त्याला जाब विचारला असता त्याने दोघांनाही मारहाण केली होती. अखेर पिडीतेने डहाणू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर गौतम विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी याप्रकरणी अधिक तपास करत आरोपी सुनिल गौतम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top