लक्झरी बसमधुन गुटख्याची तस्करी!

0
16

* महामार्गावर 4.74 लाखांचा गुटखा पकडला

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : मागील काही महिन्यांपासुन ट्रक व टेम्पोंमधुन अवैधरित्या होणार्‍या गुटख्याच्या तस्करीवर पालघर पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यातून पोलीसांनी कोट्यावधी रुपयांचा गुटखा आतापर्यंत जप्त केला आहे. पोलिसांकडून ट्रक व टेम्पोंवर होणारी कारवाई पाहता धाबे दणाणलेल्या तस्करांनी आता शक्कल लढवत लक्झरी बसमधुन गुटख्याची तस्करी सुरु केल्याचे दिसत असुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका खाजगी लक्झरी बसमधुन सुमारे 4 लाख 74 हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे.

पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला शनिवारी (30 मार्च) एका खाजगी लक्झरी बसमधुन गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वसई युनिटने मुंबईच्या दिशेने येणार्‍या आर.जे. 27/पी.बी. 9855 या क्रमांकाच्या बसला अडवून तपासणी केली असता त्यात 4 लाख 74 हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. यानंतर बसचालक संजयभाई कुबेरभाई बराण्डा (वय 38) व त्याचा साथिदार देवीलाल गेहरीलाल जाट (वय 48, दोघेही रा. राजस्थान) या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन मुंबईतील दहिसर येथील सुनिल चौधरी नामक इसमाच्या सांगण्यावर गुटख्याची वाहतूक केल्याचे या दोघांनी प्राथमिक चौकशीत सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments