दिनांक 22 September 2019 वेळ 4:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » 2 ते 15 एप्रिल दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश

2 ते 15 एप्रिल दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश

प्रतिनिधी /पालघर दि. 31 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिल रोजी निवडणुक होत असुन नामनिर्देशनपत्र भरणे, नामनिर्देशन पत्राची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेणे आदी प्रक्रियांदरम्यान उमेदवारांसमवेत राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते व इतर नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून वाद-विवाद होण्याची तसेच मोर्चे, आंदोलनांची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 2 ते 15 एप्रिल दरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

बातमी ऐका

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी 2 एप्रिल ते 9 एप्रिल असा असुन 10 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी व 12 एप्रिल रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. या कामकाजाकरीता उमेदवारांसोबत 4 लोकांखेरीज इतर नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयापासून 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2)(3) अन्वये 2 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयापासून 100 मीटरच्या परिसरात विविध राजकीय पक्ष व संघटना, तसेच इतर व्यक्तींकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलनं व रास्ता रोको करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांकरीता शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी, विविध उपक्रमांकरीता आमंत्रित करण्यात येणारे शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी, शासकीय कामकाजानिमित्त येणारे नागरीक, राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या व्यक्ती तसेच विविध राजकीय पक्ष व विविध संघटना तसेच इतर व्यक्तींकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणार्‍या ज्या व्यक्ती जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागाची परवानगी घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सोबत येतील अशा 5 पेक्षा कमी संख्येने येणार्‍या व्यक्तींना हा मनाई आदेश लागू राहणार नाही.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top