कायदेविषयक शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

0
12

प्रतिनिधी/वाडा, दि. 31 : विधी सेवा समिती व वकील संघटनेच्या वतीने काल, शनिवारी तालुक्यातील खरीवली जिल्हा परिषद शाळेत विशेष कायदे विषयक व जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालकांसाठी असलेली कायदेशीर सेवा व संरक्षण योजना, रॅगिंग विषयक कायदे, मुलांचे हक्क तसेच शासनाच्या बेटी बचाव-बेटी पढाव योजनेविषयी वकील अ‍ॅड. विनय भोपतराव, दिलीप पष्टे व अविनाश साळवे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी खरीवलीचे ग्रामसेवक संजय पाटील, विधी सेवा समितीच्या सूचिता कथडे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद पाटील आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments