दिनांक 21 September 2019 वेळ 5:59 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

वाड्यात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

प्रतिनिधी/वाडा, दि. 31 : शहरातील खंडेश्वरी नाका येथील एका घराच्या खिडकीतुन आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व चांदीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भरत आंबवणे यांच्या भागीरथी निवास बंगल्याच्या एका बेडरूमच्या खिडकीच्या लोखंडी सळ्या वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटातील 80 हजार रुपये रोख व 30 हजार रुपये किंमतीचा रेणुका देवीचा 250 ग्राम वजनाचा चांदीचा मुखवटा असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top