दिनांक 21 September 2019 वेळ 6:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि. 31 : तालुक्यातील सापणे बु. येथील 23 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घराच्या वाश्याला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विनोद गोविंद काळे असे सदर तरुणाचे नाव असुन त्याने कोणत्या कारणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेले हे समजू शकले नाही.

विनोदच्या कुटुंबियांनी गावाबाहेर नविन घर बांधले असुन सर्व कुटुंबीय नविन घरात वास्तव्यास असतात. शुक्रवारी हळदी समारंभासाठी घराबाहेर पडलेला विनोद पुन्हा घरी परतला नसल्याने त्याचा भाऊ त्याला शोधत जुन्या घरी आला असता विनोदने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत वाडा पोलीसांना खबर मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top