अवैध दारु धद्यांवर कारवाई, 39 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
19

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 29 : वालीव, अर्नाळा व सातपाटी पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यांवर काल, गुरुवारी पोलीसांनी कारवाई करत एकुण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काल, वसई तालुक्यातील वालीव पोलीसांनी विना परवाना देशी दारु विक्री करणार्‍या एका अड्ड्यावर छापा मारुन 4 हजार 512 रुपयांचा मुद्देमाल तर अर्नाळा पोलीसांनी गावठी हातभट्टी लावुन दारु तयार करणार्‍या अड्ड्यावर छापा मारुन 29 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सातपाटी पोलीसांनी देखील अवैधरित्या दारु विक्री करणार्‍या एका अड्ड्यावर छापा मारुन 5 हजार 448 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments