दिनांक 21 September 2019 वेळ 6:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्याच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात महिला एकवटल्या

वाड्याच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात महिला एकवटल्या

शहरातील महिलांचे मानवी साखळी आंदोलन

प्रतिनिधी/वाडा, दि. २९ : येथील नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर यांच्या दारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांनी सार्वजनिकपणे एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ वाड्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे महिलांची मानवी साखळी करत अनोखे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा व मुख्याधिकारी मवाडेच्या निषेधाचे फलक हाती घेऊन महिलाशक्ती एकवटली होती.

वाडा नगरपंचायतीच्या डंपींग ग्राऊंडचा प्रश्न अनेक वर्षापासून भिजत आहे. वाडा – भिवंडी महामार्गालगत ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता त्याठिकाणी एका तरुणाचा अपघात झाल्याने गांध्रे गावातील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास मनाई केली. त्यामुळे कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न नगरपंचायतीपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २५) झालेल्या बैठकीत एका खाजगी मालकाच्या जागेत तात्पुरता कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तिथेही काही अडचणींमुळे त्या जागेतही कचरा टाकणे शक्य न झाल्याने मंगळवारी (दि. २६) मुख्याधिकारी मवाडे यांनी नगराध्यक्ष कोलेकर यांना फोन करून कचरा तुमच्याच दारात खाली करतो असे म्हणत कचरा भरलेली वाहने थेट नगराध्यक्षांच्या दारात उभी केली होती. या घटनेने एका आदिवासी समाजातील महिला लोकप्रतिनिधीचा अशाप्रकारे अपमान केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती.

वाडा शहराच्या प्रथम नागरिकाचा एक प्रशासकीय अधिकारी असा सार्वजनिकपणे अपमान करत असेल तर केवळ एका महिलेचा अपमान नसून समस्त महिलावर्गाचा अपमान असल्याने वाड्यातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे शुक्रवारी ( दि. २९ ) नगरपंचायत कार्यालयापासून बसस्थानकापर्यंत मानवी साखळी करत मुख्याधिकारी मवाडे यांचा निषेध केला. यावेळी नगराध्यक्षांचा अपमान करणारे मुख्याधिकारी मवाडे चलेजाव, मवाडे हाय- हाय, आदिवासी महिला लोकप्रतिनिधीचा अपमान सहन करणार नाही, मवाडे होश मे आओ महिलाओं का सम्मान करो, महिला लोकप्रतिनिधीचा अपमान करणाऱ्या विक्षिप्त मुख्याधिकाऱ्यां करवाई झालीच पाहिजे असे घोषणा फलक हाती घेऊन शेकडो महिला नगरपंचायत कार्यलयावर धडकल्याने प्रशासन चांगलेच हडबडले. या आंदोलनानंतर ह्या महिला तहसील कार्यालयात जावून नायब तहसिलदार फारूख आत्तार यांची भेट घेत मुख्याधिकाऱ्यांविरोधात महिलांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. या आंदोलनात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, भरती सपाटे, मेधा भावे, रेश्मा पाटील, समृध्दा पातकर, रोहिणी पाटील, नयना चौधरी, वर्षा गोळे, जागृती काळण, शुभांगी धानवा यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

संबंधित बातमी :
कचर्‍याच्या गाड्या पाठवल्या नगराध्यक्षांच्या दारात!

comments

About Rajtantra

Scroll To Top