दिनांक 30 May 2020 वेळ 9:17 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » हिंदुस्तान पेट्रोलियमकडून जव्हार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

हिंदुस्तान पेट्रोलियमकडून जव्हार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

प्रतिनिधी/जव्हार, दि. 28 : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियमने आपल्या सीएसआर फंडातून जव्हार महाविद्यालयातील अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले. यावेळी 474 विद्यार्थ्यांना एकूण 24 लाख 80 हजार रूपये एवढ्या भरीव रक्कमेची शिष्यवृती प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी हिंदुस्तान पेट्रोलियमचे दिनेश प्रसाद, सदानंद माने व सूरज बनसोडे उपस्थित होते. आमची कंपनी मागासवर्गीय व उपेक्षित समाजाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असेल, अशी ग्वाही दिनेश प्रसाद यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांनी केले. तर प्रा. शैलेश बगडाने यांनी सूत्रसंचलन व डॉ. विक्रांत पाळेकर यांनी उपस्थिताचे आभार मानले. डॉ. बी. एल. जाधव यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. एम .भागडे तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top