दिनांक 25 May 2019 वेळ 10:24 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर विधी महाविद्यालयाचा अभ्यास दौरा, ठाणे मध्यवर्ती कारागृहाला दिली भेट

दांडेकर विधी महाविद्यालयाचा अभ्यास दौरा, ठाणे मध्यवर्ती कारागृहाला दिली भेट

वार्ताहर/पालघर, दि. 27 : सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या
प्रथम व व्दितीय वर्षाच्या 90 विद्यार्थ्यांनी नुकतीच अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने ठाणे मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या दौरातून विद्यार्थ्यांना कारागृहातील विधी-कायद्याशी निगडीत विविध पद्धती व सोपस्कार, कैद्यांची विभागणी तसेच कारागृहातील नियम आदी विषयांचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली.

कारागृहातील गुन्हेगार शिक्षा भोगून समाजात एक चांगला नागरिक (घटक) म्हणून समाविष्ट होण्यासाठी सुधारगृहात ज्या काही विशिष्ट उपाययोजना अंमलात आणल्या जातात. जसे की कैद्यांसाठी कारागृहातच कारखाने, हातमाग, बागकाम, शेती, उच्च शिक्षण तसेच इतर समाजप्रबोधन कार्यक्रमांबाबत इंतभुत माहिती विद्यार्थ्यांना यावेळी जाणून घेता आली. या दौर्‍यात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांच्यासह अ‍ॅड. दिशा तिवारी, अ‍ॅड. उत्कर्षा जुन्नकर व अ‍ॅड राधा मित्रा तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top