दिनांक 21 September 2019 वेळ 6:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा, बहुमत सेना – भाजपकडे डॉ. उज्वला काळे नव्या नगराध्यक्षा

नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा, बहुमत सेना – भाजपकडे डॉ. उज्वला काळे नव्या नगराध्यक्षा

* पालघर नगरपरिषद निवडणूक २०१९ :

निकालानंतर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार डॉ. उज्वला काळे व राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे कार्यकर्ते जल्लोष करताना…

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. २५ : पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल आश्चर्यकारक असा आला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. उज्वला काळे या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत विजयी झाल्या आहेत. परंतु आघाडीकडे बहुमत आले नसून 14 नगरसेवक निवडून आणणारा शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे ७ नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ नगरसेवक निवडून आलेले आहेत. ५ जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. कॉंग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला भोपळा देखील फोडता आलेला नाही

या वेळी प्रथमच भाजप आणि शिवसेना युती करुन निवडणूकीला सामोरे गेले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघरमध्ये सेना नेतृत्वाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आयात झालेल्या श्वेता मकरंद पाटील या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा निर्णय वादग्रस्त आणि आत्मघातकी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे व निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यामुळे सेनेला बंडखोरीचा सामना करावा लागला. त्यातून डॉ. उज्वला यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. भाजप सेनेला प्रचारात थेट मुख्यमंत्र्यांना उतरवावे लागले. मात्र तरीही नगराध्यक्षपदाची जागा मिळवता आली नाही.

उज्वला काळे कोण आहेत?

उज्वला काळे या पालघर नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणूकीत भाजपतर्फे निवडून आल्या होत्या. त्यानंतरच्या काळात भाजप केंद्रातून व राज्यातून सत्तेवरून पायाउतार झाल्यानंतर त्यांचे पती केदार काळे व उज्वला कॉंग्रेसमध्ये आल्या. केदार काळे हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून उज्वला या कॉंग्रेस नगरसेविका होत्या. आता आघाडीच्या समीकरणात पालघर शहरात कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची अट मान्य करुन घड्याळ चिन्हावर उभ्या राहिल्या व विजयी झाल्या. आता त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये व पती कॉंग्रेसमध्ये असल्यामुळे आघाडीचे समीकरण जुळलेले राहिल. शिवाय बहुमत सेना भाजपकडे असले तरी त्यांनी सेना भाजपमध्ये केलेले असल्याने नगरपरिषदेचा सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यात त्यांना अडचण येणार नाही.

उमेदवार, पक्ष व त्यांना मिळालेल्या मतांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे!

(विजयी उमेदवारांची नावे, पक्ष व मते ठळक अक्षरात)

  • 1 अ-अनुसुचित जमाती
    दिनेश पांडूरंग बाबर (अपक्ष) 1019
    विलास पांडुरंग काटेला (भाजप) 267
    भालचंद्र दांडेकर बाबू (राष्ट्रवादी) 331
    नितेश एकनाथ बसवत (अपक्ष) 109
  • 1 ब-सर्वसाधारण (महिला)
    मेमन शेरबानु मुनाफ (अपक्ष) 1087
    रुंजी राजेश घुडे (शिवसेना) 310
    सुनीता मधुकर भोईर राष्ट्रवादी 267
    मनीषा प्रमोद काळपुंड अपक्ष 61
  • 2 अ -नागरीकांचा मागास प्रवर्ग(महिला)
    प्रियंका राजेंद्र म्हात्रे शिवसेना 1298
    परविन अफरोज शेख बविआ 659
  • 2 ब-सर्वसाधारण
    रवींद्र मधुकर म्हात्रे शिवसेना 787
    इम्रान करीम शेख राष्ट्रवादी 292
    आरिफ उस्मान कलाडीया अपक्ष 514
    बिंदिया संतोष दीक्षित अपक्ष 409
    जावेद मजीद लुलानीया अपक्ष 6
    विकास शिवशरण सिंह अपक्ष 8
  • 3 अ-अनुसुचित जमाती(महिला)
    मोना मुन्ना मिश्रा भाजप 1451
    कांता रविंद्र अधिकारी बविआ 797
    योगिता चंदू धोडी अपक्ष 447
  • 3 ब-सर्वसाधारण
    तुषार दिलीप भानुशाली शिवसेना 1062
    सुरज रमेश धोत्रे राष्ट्रवादी 1005
    मनोहर सोनू दांडेकर अपक्ष 247
    संजू किसन धोत्रे अपक्ष 215
    महेश अर्जुन धोडी अपक्ष 186
    आमदयाल उग्रनाथ यादव अपक्ष 21
  • 4 अ-अनुसुचित जमाती (महिला)
    कविता सुरेश जाधव अपक्ष 1051
    हेमा कृष्णकांत गडग राष्ट्रवादी 171
    मनीषा राजू लडे भाजप 745
  • 4 ब-सर्वसाधारण
    प्रविण मधुकर मोरे अपक्ष 1080
    कुश संजय दुबे राष्ट्रवादी 139
    अमर शिवमोहन द्विवेदी शिवसेना 729
  • 5 अ-अनुसुचित जमाती
    दिनेश गोपाळ घरट शिवसेना 1476
    स्वप्नाली वामन जाधव राष्ट्रवादी 1253
  • 5 ब-सर्वसाधारण (महिला)
    हिंदवी विरेंद्र पाटील राष्ट्रवादी 1354
    गीतांजली अद्वैत पाटील शिवसेना 1043
    रेश्मा हिमांशु घरत अपक्ष 359
  • 6 ब-सर्वसाधारण (महिला)
    लक्ष्मीदेवी धनराज हजारी भाजप 1054
    धृतिका महेश पंड्या राष्ट्रवादी 429
    सफीना रईस खान अपक्ष 976
  • 7 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
    राजेंद्र आत्माराम पाटील शिवसेना 1473
    अनिस अशरफ शेख बविआ 1013
  • 7 ब – सर्वसादारण महिला
    अलका पोपटसिंग राजपुत भाजप 1237
    आरती हिमालय संखे राष्ट्रवादी 1221
  • 8 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
    चंद्रशेखर गोपीनाथ वडे शिवसेना 709
    संतोष अशोक चुरी बविआ 410
    उत्तम रमेश पिंपळे अपक्ष 698
  • 8 ब-सर्वसाधारण (महिला)
    शिल्पा अमर बाजपेई राष्ट्रवादी 999
    वंदना सुरेंद्र तिवारी शिवसेना 783
  • 9 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    अनुजा अशोक तरे शिवसेना 668
    शालिनी राधाकृष्णन मेनन बविआ 320
  • 9 ब- सर्वसाधारण
    प्रथमेश उत्तम पिंपळे अपक्ष 497
    अतुल जनार्दन पाठक शिवसेना 465
    अनिता प्रफुल्ल प्रजापती राष्ट्रवादी 50
  • 10 ब-सर्वसाधारण
    अक्षय किशोर संखे शिवसेना 988
    निशांत शरद धोत्रे मनसे 100
    सचिन बाबुराव पाटील राष्ट्रवादी 971
  • 11 अ-अनुसूचित जाती महिला
    चेतना हेमंत गायकवाड शिवसेना 994
    कृतिका दिनेश गवई मनसे 831
    वृषाली विकास भोणे राष्ट्रवादी 652
    स्नेहल प्रशांत गायकवाड अपक्ष 171
    रुपाली श्याम शेलार अपक्ष 62
  • 11 ब-सर्वसाधारण
    भावानंद शांताराम पाटील भाजप 1039
    विनय गंगाधर आघाव मनसे 598
    नंदकुमार वामन पाटील राष्ट्रवादी 718
    कैलास तुलसीप्रसाद त्रिवेदी भाकप (मार्क्स) 62
    सागर भरत मौर्य अपक्ष 332
  • 12 अ-सर्वसाधारण (महिला)
    राधा अरविंद मानकामे शिवसेना 1829
    दिपा तुशार पामाळे राष्ट्रवादी 1351
  • 12 ब-सर्वसाधारण
    सुभाष विष्णू पाटील शिवसेना 1978
    भुपेंद्र घरत राष्ट्रवादी 1025
  • 13 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
    अनिता शशिकांत किणी भाजप 1537
    दर्शना दत्तोत्रय राऊत राष्ट्रवादी 1268
    गीता गंगाराम संखे मनसे 212
  • 13 ब-सर्वसाधारण
    अमोल प्रकाश पाटील शिवसेना 1426
    गौतम नामदेवराव गायकवाड राष्ट्रवादी 1290
    अविनाश श्रीराम भोरे मनसे 129
    राऊत चंद्रकांत भास्कर अपक्ष 111
    कृष्णा रामप्यारे उपाध्याय अपक्ष 89
  • 14 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
    उत्तम मोरेश्‍वर घरत शिवसेना 1293
    किरण राजेंद्र पाटील काँग्रस 400
    प्रतिक संजय चौधरी अपक्ष 103
    परेश चंद्रकांत पाटील अपक्ष 153
    अजित मनाहर भुवड अपक्ष 23
  • 14 ब-सर्वसाधारण (महिला)
    रोहिणी अशोक अंबुरे भाजप 1122
    प्रफुल्ला जितेंद्र परमार राष्ट्रवादी 510
    नेहा नितीन शिंदे अपक्ष 315
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top