दिनांक 22 September 2019 वेळ 5:44 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा : खासगी बस दरीत कोसळून 4 ठार

मोखाडा : खासगी बस दरीत कोसळून 4 ठार

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 24 : मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगण घाटात एक खासगी लक्झरी बस 25 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली असुन यामध्ये 4 प्रवासी ठार तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना त्र्यंबकेश्वर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असुन काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, जी.जे.17/यु.यु.1148 या क्रमांकाची खासगी लक्झरी बस 56 प्रवाशांना घेऊन शिर्डीहून त्र्यंबकेश्वर मार्गे डहाणूतील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी निघाली होती. मात्र मोखाडा त्र्यंबकेश्‍वर मार्गावरील मोखाडा-पालघर रस्त्याची हद्द सुरु झाल्यानंतर लागणार्‍या तोरंगण घाटेत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बस थेट 25 फुट दरीत जाऊन उलटली. यात 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 40 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली असुन मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी असल्याचे समजते.

तोरंगण घाट ठरतोय मृत्यूचा सापळा

मोखाडा-त्र्यंबकेश्‍वर मार्गावरील तोरंगण घाटात यापुर्वी देखील अनेक अपघात घडले असुन घाटातील काही धोकादायक ठिकाणी सुचना फलक व संरक्षक भिंती नसल्याने चालकाचा अंदाज चूकुन अपघात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top