दिनांक 18 April 2019 वेळ 8:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर नगर परिषद निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदान

पालघर नगर परिषद निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदान

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 24 : पालघर नगरपरिषदेसाठी आज, रविवारी मतदान होत असुन दुपारी ३.30 वाजेपर्यंत 54.30 टक्के मतदान झाले आहे. 3.30 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण 47 हजार 850 मतदारांपैकी 25 हजार 981 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यात 13 हजार 777 पुरुष मतदारांचा तर 12 हजार 304 महिला मतदारांचा समावेश आहे. या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासह 14 प्रभागांतील 28 जागांसाठी एकूण 90 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 25 टक्के तर 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत 41.29 टक्के मतदान झाले होते. तर दुपारच्या चटके देणार्‍या 37 अंश तापमानाचा काहीसा परिणाम मतदानावर दिसुन आल्याने 1.30 ते 3.30 या दोन तासांच्या काळात 13 टक्के मतदान झाले. दरम्यान, प्रभाग क्रमांक 11 मध्ये 15 मिनिटांसाठी ईव्हीम मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. तर दुसरीकडे संपूर्ण पालघर नगरपरिषदेच्या हद्दीत पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही एकंदरीत राजकीय वातावरण उत्साहाचे दिसून आले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top