दिनांक 22 September 2019 वेळ 4:59 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर लोकसभा मतदारसंघासाठी बविआ ला महाआघाडीचा पाठिंबा

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी बविआ ला महाआघाडीचा पाठिंबा

Rajtantra Media
महाराष्ट्रात ५६ पक्षांची संयुक्त पुरोगामी महाआघाडी अस्तित्वात आली असून त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, पीआरपी, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह राज्यातील ५६ पक्षांचा समावेश आहे. आज मुंबई येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर, पीआरपीचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आ. रवी राणा उपस्थित होते. संयुक्त पुरोगामी महाआघाडीमध्ये कॉंग्रेस 24, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2, बहुजन विकास आघाडी 1 व युवा स्वाभिमानी पक्ष 1 जागा असे जागांचे वाटप करण्यात आले आहे. हितेंद्र ठाकूर यांनी पालघर लोकसभा मतदारसंघासाठी कंबर कसली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला आधीच पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे. आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाठिंबा मिळाल्यामुळे बहुजन विकास आघाडी व शिवसेना भाजप युतीमध्ये सरळ दुरंगी लढत होणार आहे.

शिवसेना बॅकफूटवर: भाजपचा विद्यमान खासदार असलेली पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची करुन पदरात पाडून घेतली असली तरी पालघर नगरपरिषदेत शिवसेनेने निष्ठावंताना डावलून आयारामाना दिलेली संधी व त्यातून झालेली बंडखोरी, भाजपच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणि हितेंद्र ठाकूर यांची व्यूहरचना या चक्रव्यूहातून शिवसेनेला बाहेर पडणे सोपे राहिलेले नाही. यातून शिवसेना ही जागा भाजपसाठी परत करु शकते असा अंदाज व्यक्त होत आहे.

श्रीनिवास वणगांना आधीच उमेदवारी जाहीर केलेली असताना पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर न झाल्याने याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top