दिनांक 21 May 2019 वेळ 12:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दुकानाचे शटर तोडून कपड्यांची चोरी

दुकानाचे शटर तोडून कपड्यांची चोरी

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : वाड्यातील खंडेश्वर नाका येथील हरिओम कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या साईलीला मेन्स वेअर या दुकानाचे शटर तोडून दुकानातील हजारो रुपये किंमतीचे तयार कपडे चोरट्यांनी लंपास केले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली.

हर्षल व अभिजीत शर्मा नामक दोघा भावंडांचे सदर दुकान असुन या दुकानात पुरुषांचे विविध कंपन्यांचे तयार कपडे विक्री केले जातात. विशेष म्हणजे हरिओम कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर एच.डी.एफ.सी. बँकेची शाखा असुनही या ठिकाणी रात्री कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था अथवा सी.सी.टीव्ही कॅमेरे नाहीत. याचाच फायदा घेत चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून हजारो रुपये किंमतीचे कपडे लंपास केले. दरम्यान, चोरट्यांनी दुकानातील फर्निचरचीही नासधूस केली असून यात एकुण 1 लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले असल्याचे दुकानाचा मालक अभिजित शर्मा याने सांगितले. याप्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top