दिनांक 24 March 2019 वेळ 4:34 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » रोशनी फाउंडेशनच्या सौजन्याने शाळेसाठी अद्ययावत शौचालय

रोशनी फाउंडेशनच्या सौजन्याने शाळेसाठी अद्ययावत शौचालय

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि.१७: डहाणू तालुक्यातील सोगवे डोंगरीपाडा येथील जिल्हा परिषद संचलित शाळेसाठी रोशनी फाउंडेशनच्या वतीने अद्ययावत व सुसज्ज असे शौचालय बांधून देण्यात येत आहे. आज रोशनी फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालिका श्रीमती गीता मुच्छाला, विश्वस्त संजीव मुच्छाला, दिलीप कवय्या, योगिनी त्रिवेदी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण दादासो जुन्नर, सोगवेचे सरपंच लक्ष्मण राबड, ग्रामपंचायत सदस्य मिनाताई अंधेर व विलास उंबरसाडा, सावटे केंद्राचे केंद्रप्रमुख वर्तक उपस्थित होते.

फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी सवयी लागाव्यात, त्यांचे आरोग्य निरोगी रहावे व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आवश्यक असे विविध उपक्रम राबवले जातात. फाउंडेशनच्या वतीने विविध शाळा दत्तक घेण्यात आल्या असून अशा शाळांना आवश्यक ते सर्व साहित्य, कॉम्प्युटर, क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. तसेच मुलींच्या स्वरक्षणासाठी कराटे क्लासेस सारखे नानाविध उपक्रम राबवण्यात येतात. युनिट दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये यापूर्वी ४ शौचालये बांधून पूर्ण झालेली आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top