दिनांक 21 May 2019 वेळ 1:02 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यातील लोकअदालतमध्ये 381 खटले निकाली

वाड्यातील लोकअदालतमध्ये 381 खटले निकाली

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : वाडा दिवाणी न्यायालयाच्या वतीने आज, रविवारी वाडा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये आप-आपसात समजोता होऊन 381 खटले निकाली काढण्यात आले. तर बँक कर्ज थकबाकीदार व ग्रामपंचायतीचे कर थकबाकीदार यांच्याकडून एकुण 72 लाख 74 हजार 170 रुपयांची थकबाकी या लोकआदलतच्या माध्यमातून वसुल करण्यात आली.

या लोक आदालतमध्ये 1,365 दखलपुर्व प्रकरणे व 189 दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामधील तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या एकुण 1,293 पक्षकारांकडून 71 लाख 74 हजार 309 रुपयांची विविधरुपी थकबाकीची वसुली होऊन 360 खटले निकाली काढण्यात आले. तर तालुक्यातील विविध बँकांमधील 98 पक्षकारांकडून 99 हजार 261 रुपयांची थकबाकी वसुल होऊन 10 पक्षकारांचे खटले निकालात काढण्यात आले.

फौजदारी व दिवाणी प्रकरणातील 11 खटले आजच्या लोक अदालतमध्ये निकाली काढण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एस. एस. परदेशी यांनी दिली. या लोकअदालतमध्ये वाडा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सुचिता कथडे, कनिष्ठ लिपिक एस.व्ही.चिंचवळीकर तसेच वकिल संतोष डेंगाणे, प्रमोद भोईर, राजेश भोईर, सुबोध पाटील, तानाजी अधिकारी आदींनी विशेष सहकार्य केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top