दिनांक 24 March 2019 वेळ 4:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » एसविपी पॅकिंग इंडिया तर्फे रोजगार मेळावा

एसविपी पॅकिंग इंडिया तर्फे रोजगार मेळावा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. १७: पालघर जिल्ह्यातील एसविपी पॅकिंग इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने पालघर मधील सेन्ट जॉन कॉलेजमध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला सेन्ट जॉन कॉलेजमधील तरुणांनी मोठया प्रमाणावर उपस्थिती लावली होती. एसविपी पॅकिंग इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी चांगल्या उत्पादनासोबत नवीन उमद्या तरुणांना नोकरीही उपलब्ध करून देत असल्याचे यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती आशना शहा यांनी सांगितले. आतापर्यंत कंपनीने अनेकांना काम करण्याची संधी दिली असल्याची माहिती शहा यांनी दिली. यावेळी सेंट जॉन कॉलेजचे चेअरमन अल्ड्रिंज डी. डिसूझा, प्राचार्य डॉ. जी. वि. मुलुगुंड, कंपनीचे व्यवस्थापक इका पिलाई , राहुल वर्तक,अनिल बिलवा, सेन्ट जॉनचे नामदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top